LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*पंढरपूरच्या घरचा दिवाळी फराळ आता थेट परदेशात*!पंढरपूर हेड पोस्ट ऑफिसकडून आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन


पंढरपूर, दि. २८ ऑक्टोबर : दिवाळीच्या सणानिमित्त परदेशात वास्तव्यास असलेल्या आपल्या नातेवाईक, मित्र व आप्तेष्टांना घरचा पारंपरिक फराळ, मिठाई व इतर योग्य वस्तू पाठविण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांसाठी पंढरपूर हेड पोस्ट ऑफिसच्या वतीने आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच विविध कारणांमुळे अनेक भारतीय नागरिक परदेशात वास्तव्यास आहेत. दिवाळीच्या सणाला आपल्या घरचा फराळ आणि आपुलकीची भेट त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय डाक विभागाची आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा उपयुक्त ठरत आहे. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, संयुक्त अरब अमिराती, रशिया यांसह सुमारे 200 हून अधिक विविध देशांमध्ये पार्सल पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

पंढरपूर परिसरातील नागरिकांकडून या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परदेशात फराळ पाठविण्यासाठी नागरिकांनी आतापासूनच पार्सल बुकिंग करावे, असे आवाहन *पंढरपूर विभागाचे अधिक्षक डाकघर श्री. मयुरेश कोले* यांचेकडून करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय पार्सल बुक करण्यापूर्वी संबंधित देशात पाठविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांना परवानगी आहे किंवा नाही, वस्तूचे स्वरूप, वजन, आकारमान, शुल्क तसेच आवश्यक कागदपत्रे व पॅकिंगच्या नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे. प्रत्येक देशाचे आयात नियम वेगवेगळे असल्याने पार्सल बुक करण्यापूर्वी संबंधित वस्तूंची परवानगी व नियमांची खात्री करून घेणे गरजेचे आहे.

योग्य पॅकिंगला विशेष महत्त्व

परदेशात पाठविण्यात येणाऱ्या फराळाच्या पदार्थांचे सुरक्षित व नियमांनुसार पॅकिंग करणे आवश्यक आहे. वस्तूंची सुरक्षितता, योग्य पत्ता, मोबाईल क्रमांक, आवश्यक कागदपत्रे आणि योग्य घोषणा यांची पूर्तता केल्यानंतर पार्सल बुकिंग करता येते. पंढरपूर हेड पोस्ट ऑफिसमध्ये याबाबत नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे.

दिवाळीच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय पार्सलची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने शेवटच्या क्षणी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी शक्य तितक्या लवकर पार्सल बुक करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“आपल्या घरचा दिवाळी फराळ, आपल्या माणसांपर्यंत परदेशात!” या भावनेतून नागरिकांनी भारतीय डाक विभागाच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंढरपूर हेड पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर श्री. सोमनाथ गायकवाड यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments