LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्प मार्गी नाही लागला तर आंदोलन करणार - दिलीप धाेत्रे

पंढरपूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजना यासाठी पंढरपूर शहरातील अनेक गोरगरीब नागरिकांनी बँकेचे कर्ज काढून खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन घरातील सोनं नाण मोडून मंगळसूत्र मोडून यासाठी नगरपालिकेकडे लाखो रुपये जमा केले होते. 


परंतु आज पर्यंत एकालाही घर मिळालेले नाही जे लाभार्थी आज पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते , त्यांचे नाव त्यांचे मोबाईल नंबर आणि नगरपालिकेकडे घरासाठी भरलेले रक्कम आपल्या माहितीस्तव देत आहे .येत्या पंधरा दिवसांमध्ये जर हा प्रकल्प मार्गी नाही लागला तर या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे.

 त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब ,यांना पंढरपूर शहरातील लाभार्थ्यांना बरोबर घेऊन दिल्ली येथे जाऊन त्यांची भेट घेऊन पंढरपूर शहरातील हा विषय सांगण्यात येणार आहे..



Post a Comment

0 Comments