मुंबई प्रतिनिधी : -
अंधेरी भागातील एका हॉटेलच्या खोलीत 40 वर्षीय मॉडेलचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आठच्या सुमारास मॉडेलने हॉटेलमध्ये दाखल झाली आणि जेवणाची ऑर्डरही दिली.
गुरुवारी हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांनी वारंवार फोन करूनही तिने दरवाजा उघडला नाही. यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापकाने पोलिसांना माहिती दिली. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर पोलिसांनी मास्टर चावीने खोली उघडली असता मॉडेलचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
दरम्यान स्थळावरून पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे.सुसाइड नोटवर मॉडेलने लिहिले की, 'मला माफ करा. याला कोणीही जबाबदार नाही. मी आनंदी नाही. मला फक्त शांतता हवी आहे.'वर्सोवा पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तपास सुरू आहे. पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.
0 Comments