पंढरपूर प्रतिनिधी: - पंढरपूरचा होणारा विकास आराखडा यावर चर्चा करण्यासाठी, विचार विनिमय करण्यासाठी पंढरपूर शहरातील चौफाळा येथे पंढरपूर शहरातील बाधित होणारे छोटे-मोठे व्यापारी,खोके धारक, भाजी मंडईतील भाजी विक्रेते ,मंदिर परिसरातील सर्व दुकानदार, व्यापारी ,या सर्वांशी चर्चा करण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी पंढरपूर शहरातील चौफाळा येथे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, विठ्ठल परिवाराची नेते भगीरथ दादा भालके यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली.
यावेळी कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुण भाऊ कोळी ,शिवसेनेचे शिंदे गटाचे संपर्क प्रमुख महेश नाना साठे, शिवसेना ठाकरे तालुका अध्यक्ष संजय घोडके, काँग्रेस चे शहर अध्यक्ष राजेश भादुले, नगरसेवक किरणराज घाडगे, नगरसेवक संजय बंदपट्टे, मनसेचे शहर अध्यक्ष संतोष कवडे, मनसे उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळणेरकर, हिंदू महासभेचे विवेक बेणारे, अभयशिंह इचगावकर, पत्रकार महेश खिस्ते,बाळासाहेब डिंगरे,भाजपचे काशीनाथ थिटे, बाबा बडवे, शिरीष कटेकर, नगरसेवक मोहम्मद उस्ताद, सतीश अप्पा शिंदे, मी वडार महाराष्ट्राचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भोसले, सुमित शिंदे, दत्ता काळे, महेश पवार, महिला राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष साधनाताई राऊत ,व्यापारी आघाडीचे कौस्तुभ गुंडेवार, माऊली गांडूळे, शहाजी शिंदे इत्यादी उपस्तीत होते..
0 Comments