पंढरपूर प्रतिनिधी : -
सालाबादप्रमाणे यावर्षी अन्नकुट उत्सव साजरा करण्यात आला या अन्नकोट उत्सव बद्दल माहिती देताना केशव गोशाळेचे ज्येष्ठ ट्रस्टी नंदकिशोरजी मर्दा यांनी सांगितले की, गिरीराज पर्वताचे मूर्ती स्थापन करून गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते यावेळी देवाला 56 नवनवीन पदार्थ बनवून देवाला नैवेद्य दाखवला जातो. यालाच पाच भोग तसेच अन्नकोट म्हणतात दरवर्षी हा प्रसाद पंढरपूर येथील श्री केशव गोशाळा येथे होत असतो.
सदर कार्यक्रमासाठी सोलापूर रोड सोलापूर रोड ओम प्रकाश लड्डा बाबू शेठ बागडी चंद्रकांत तापडिया कैलास सोमानी तर मुंबईहून सुभाषचंद्र लड्डा पुणे येथून ब्रिज गोपालजी तापडिया आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते तसेच पंढरपुरातील राजस्थानी समाजाचे बंधू भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी ट्रस्टी नंदकिशोरजी मर्दा किसन गोपालजी भट्टड जगदीशजी मर्दा तसेच केशव गोशाळेचे व्यवस्थापन श्यामसुंदरजी कुडाळ सुरेश जोशी व समाज बांधवांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
0 Comments