LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

श्री विठ्ठल कारखान्यावर अपघातात एक जागीच ठार,एक कामगार गंभीर.



पंढरपूर(प्रतिनिधी) : वेनुनगर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील बॉयलिंग हाऊस मध्ये काम करत असताना हाऊस स्टीम प्रेशर वॉल फेल होऊन तुटून त्याचा दणका बसल्याने एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  सकाळी ९.३०च्या दरम्यान हा प्रकार घडला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना यंदा प्रथमच सुरू झाला आहे. चालू हंगामात कारखान्याचे दोन लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्टही कारखान्याने पूर्ण केले आहे. मात्र याचवेळी आज सकाळच्या सुमारास कारखान्याच्या बॉयलिंग हाऊस मध्ये काम सुरू असताना सदर अपघात घडला आहे. अपघातावेळी सुधाकर सदाशिव चौगुले (रा. सांगवी ता. पंढरपूर) व सोमनाथ मारुती नरसाळे (रा.जळोली ता. पंढरपूर)हे उत्पादन विभागाचे दोन कर्मचारी स्टीम वालचे काम करत होते. मात्र यावेळी यंत्रणेत बिघाड होऊन स्टीम हॉल निकामी झाला तसेच त्याचा दणका दोन्ही कामगारांना बसल्याने उंचीवरून कामगार खाली पडल्याने यामध्ये चौगुले यांचा मृत्यू झाला असून नरसाळे यांच्यावर उपचार सुरू आहे.सदर घटना घडल्यानंतर कारखाना प्रशासनाने तात्काळ कामगारांना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments