LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा उपनिबंधक सोलापूर आणि उच्च न्यायालयात अपील करणार...



पंढरपूर अर्बन बँकेच्या निवडणुकीमध्ये समविचारी आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज सत्ताधारी आघाडीच्या दबाव तंत्राचा वापर, चुकीच्या पद्धतीने केलेले नियम, आत्तापर्यंत जे नियम कोणालाही माहित नाहित किंवा कोणालाही सांगितले नाहीत अशी नियमावली अर्ज छाननी दिवशी सत्ताधारी आघाडीने  सादर केली. आणि रडी चा डाव खेळला गेला .

बँकेच्या इतिहासात आत्तापर्यंत सत्ताधारी मंडळीच्या विरोधात सर्वच्या सर्व ठिकाणी उमेदवार कोणी उभे केले नव्हते सत्ताधारी मंडळींच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून, गैर कारभाराला कंटाळून त्यांनी केलेला  गैर कारभार  चव्हाट्यावर आणण्यासाठी बहाद्दर आशा 18  अर्बन बँकेच्या सभासद मतदार बांधवांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले होते .उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दिवसापासून दबाव तंत्राचा या ठिकाणी वापर चालू होता. सत्ताधारी मंडळीचे बगलबच्चे प्रत्येक अनुमोदक आणि सूचकाच्या घरी जाऊन त्यांना त्या ठिकाणी दमदाटी करून त्यांच्या सह्या मागत होते परंतु यात देखील त्यांना यश आले नाही .आणि मग चुकीच्या पद्धतीने सत्तेचा दुरूपयोग करून या ठिकाणी समविचारी आघाडीचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहेत .निवडणूकिला सामोरे जायला सत्ताधारी आघाडी घाबरली कारण मतदार त्यांच्या विरोधात आहे.

या विरोधात आम्ही जिल्हा निबंधक सोलापूर आणि उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत.

Post a Comment

0 Comments