LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

गादेगावात अवैध दारु विक्रीवर कारवाई



           आज सोमवार दि.20 जुलै  रोजी  सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील  मौजे गादेगाव  येथे पंढरपूर गादेगाव  कडे जाणाऱ्या रोडच्या कडेला पत्रा शेडमध्ये अवैद्य देशी व विदेशी कंपनीच्या दारूची विक्री करत असल्याची बातमी मिळाल्याने लागलीस पोलीस हेड कॉन्स्टेबल रोंगे, पोलीस कॉन्स्टेबल श्री घायाळ असे सदर ठिकाणी जाऊन  पत्रा शेडमध्ये एक इसम पांढऱ्या पिशवीमध्ये व खाकी बॉक्समध्ये देशी-विदेशी कंपनीच्या दारूची विक्री करत असल्याची मिळून आल्याने त्याच त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने नाव  महादेव बापूराव इंगोले वय वर्ष 39 राहणार गादेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर  असे सांगितले त्याच्या ताब्यातून  देशी-विदेशी कंपनीच्या 124 दारूच्या बॉटल व सदर इसमाची अंगझडती घेतली असता अवैद्य दारू विक्री करून आलेले रोख रक्कम 1670 मिळून आलेली आहे. 
      एकूण देशी-विदेशी दारू च्या मालाची किंमत 9740 व रोख रक्कम 1670 रुपये अशी एकूण किंमत 11410 चा मुद्देमाल ग्रामीण पोलीस ठाणे कडील गादेगाव बीट अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळवले व पोलीस कॉन्स्टेबल 162 करणे कर यांच्याकडे पुढील योग्य ते कारवाईस्तव आरोपी व मुद्देमाल ताब्यात दिलेला आहे.

Post a Comment

0 Comments