LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

न्यु सातारा पॉलीटेक्निकच्या विद्यार्थिनीचे राज्यस्तरीय गोळाफेक क्रीडास्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक

   पंढरपूर प्रतिनिधी :- 



महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ , मुंबई यांच्या वतीने IEDSSA अंतर्गत दि. ०६ डिसेंबर २०२२ रोजी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पॉलीटेक्निक, प्रवरानगर येथे घेण्यात आलेल्या State Level  Inter Zonal IEDSSA क्रीडा स्पर्धेमध्ये ‘गोळा फेक’ या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता यामध्ये  न्यु सातारा समुह, मुंबई संचलित,न्यु सातारा पॉलीटेक्निक कोर्टी पंढरपूर येथील प्रथम वर्षातील विद्यार्थिनी कु. गौरी तानाजी धनवडे हिने या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकाविले. त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीचे कौतुक व अभिनंदन करत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम (नाना) निकम, विश्वस्थ  डॉ.लक्ष्मिकांत निकम व संचालक मंडळ व संस्था प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर शेडगे, कॉलेजचे  प्राचार्य श्री. विक्रम लोंढे, तसेच  विद्यार्थिनींना लाभलेले क्रीडा शिक्षक श्री. गणेश पडवळकर, प्रा. दिग्विजय रणदिवे व प्रा. कु. सपना धोड्मिसे तसेच क्रीडा प्रमुख प्रा. विश्वनाथ कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच  रजिस्ट्रार श्री. सतिश दिंडूरे, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. विशाल बाड, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब ननवरे  सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांना पुढील राज्यस्तरीय  स्पर्धेसाठी  शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments