LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवानिमित्त खासदार प्रणितीताई शिंदे यांचे मनोभावे दर्शन; बिडी, यंत्रमाग कामगार व उद्योगांवरील संकट दूर होण्यासाठी केली प्रार्थना*



पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी यांच्या रथोत्सवानिमित्त सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी श्री मार्कंडेय मंदिरास भेट देऊन श्रींचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी व संस्थेच्या विश्वस्तांच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांचे यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला.

यावेळी पद्मशाली समाजबांधवांना शुभेच्छा देताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की, श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सव, नारळी पौर्णिमा रक्षाबंधनाच्या निमित्ताने सर्व पद्मशाली समाजबांधवांसह सोलापूरवासीयांना आणि सर्व माता-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. हा पद्मशाली समाजाचा अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेचा सण आहे.
खासदार प्रणितीताई शिंदे पुढे म्हणाल्या की, सोलापूरच्या पूर्व भागातील बिडी व यंत्रमाग कामगार, कारखानदार आणि उद्योग क्षेत्र गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांना सामोरे जात आहे. आज बिडी व यंत्रमाग कामगारांसह उद्योगांवरही संकटाची सावली पसरली आहे. या सर्व संकटांतून सोलापूरचा पूर्व भाग, संपूर्ण सोलापूर शहर, महाराष्ट्र आणि पद्मशाली समाजबांधवांना लवकरात लवकर मुक्ती मिळावी, तसेच त्यांच्यावरील सर्व विघ्ने दूर व्हावीत, अशी प्रार्थना आपण सर्वांनी श्री मार्कंडेय महामुनींच्या चरणी करूया.

एक लोकप्रतिनिधी म्हणून कामगार, उद्योग आणि पद्मशाली समाजबांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहोत. त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेपर्यंत आणि यश मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, अशी ग्वाही खासदार प्रणितीताई शिंदे यांनी दिली.

रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त बोलताना त्या म्हणाल्या की, आज एक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते आणि त्याच्या रक्षणाची प्रार्थना करते. त्याचप्रमाणे या देशातील सर्व महिला व भगिनी सुरक्षित राहाव्यात, अशी मी श्री मार्कंडेय महामुनींच्या चरणी प्रार्थना करते. देशात पसरत असलेली विकृत मानसिकता नष्ट होऊन देश पुन्हा लोकशाही, समता आणि बंधुभावाच्या मार्गावर यावा, अशीही प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, विश्वस्त मुरलीधर अरकाल, संतोष सोमा, रमेश कैरमकोंडा, महाकाली येलदी, दयानंद आडम, नरसप्पा ईप्पाकायल, शंभू अण्णा वडलाकोंडा, तिरुपती परकीपंडला, हेमंतकुमार साका, भारतीताई इप्पलपल्ली, अंबादास गुत्तिकोंडा, चक्रपाणी गज्जम, नागेश म्याकल, विवेक कन्ना, लक्ष्मीकांत साका, सुनील सारंगी, संजय गायकवाड, दशरथ सामल, व्यंकटेश बोमेन, मनोहर माचर्ला, शुभम यक्कलदेवी, सुभाष वाघमारे, नरेश कोक्कुल, श्रीनिवास परकीपंडला, श्रीनिवास कोटा आदी उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments