कासेगाव : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्यातर्फे दिली जाणारी ' शरद पवार इन्स्पायर फेलोशिप 'डॉ.सुभाष विठ्ठल खिलारे यांना देण्यात आली. फिलोशिप प्रधान सोहळा मुंबई येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सर्व फिलोशिप विजेत्यांचा सत्कार करण्यात आला राज्यातील एकूण वीस माध्यमिक स्तरातील शिक्षकांना ही फिलोशीप देण्यात आली सदरची फिलोशीप शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण व विद्यार्थी हितासाठी संशोधन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी दिली जाते डॉ.सुभाष खिलारे हे उरुळी कांचन , जि. पुणे येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.' मराठी साहित्य विषयक गोडी निर्माण व्हावी यासाठी मुलांकडून स्वलिखित साहित्य संकलन करून प्रकाशित करणे' या संदर्भातील डॉ. खिलारे यांचे संशोधन निवडले आहे.त्याबद्दल महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सर्व विश्वस्त , प्राचार्य , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ.खिलारे यांचे अभिनंदन केले.
0 Comments