कारखान्याच्या वतीने आर्थिक मदत म्हणून कै. चौगुले यांचे कुटुंबास रु.६.०० लाख व कै. नरसाळे यांचे कुटुंबास रु.५.०० लाख मदत जाहीर केली.
पंढरपूर (प्रतिनिधी)
वेणुनगर, ०७ : श्री विठ्ठल सह. सा. कारखान्याचे उत्पादन विभागातील कर्मचारी कै. सुधाकर सदाशिव चौगुले व कै. सोमनाथ मारुती नरसाळे यांचे रविवार दिनांक ०४.१२.२०२२ रोजी कारखान्याचे बॉयलॉग हाऊसमध्ये काम करीत असताना वॉल्व फेल होवून अपघाती निधन झाले आहे. संचालक मंडळ व कर्मचारी यांचे वतीने मंगळवार दिनांक ०६.१२.२०२२ रोजी सायं, ठिक ६.०० वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित शोक सभेमध्ये त्या कामगारांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करणेत आली.
सदर प्रसंगी कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत धनंजय पाटील बोलताना म्हणाले की, सदर दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव उभे राहून त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व संचालक मंडळ सहभागी आहोत, अशी भावना व्यक्त केली व या कुटुंबांना आधार देणेसाठी कारखान्याच्या वतीने आर्थिक मदत म्हणून कै. चौगुले यांचे कुटुंबास रु.६.०० लाख व कै. नरसाळे यांचे कुटुंबास रु.५.०० लाख मदत जाहीर केली. तसेच कै. चौगुले व कै. नरसाळे यांच्या कुटुंबियांना विमा कंपनीकडून जास्तीत जास्त रक्कम मिळवून देणेचा आमचे संचालक मंडळचा प्रयत्न राहील असे सांगुन त्यांनी श्रध्दांजलीपर भावना व्यक्त केली. कामगारांनी सुरक्षेसंदर्भात आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवहन चेअरमन श्री अभिजीत पाटील यांनी केले.
सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक श्री दिनकर चव्हाण, कार्यलक्षी संचालक श्री तुकाराम मस्के, कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड, युनियन प्रतिनिधी श्री संजय घुले पाटील आदिनी के. चौगुले व कै. नरसाळे कुटुंबाच्या पाठीशी आहोत अशी श्रध्दांजलीपर भावना व्यक्त केली.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता बब्रुवाहन रोंगे, संचालक संभाजी भोसले, कालिदास पाटील, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघा, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, विठ्ठल रणदिवे, महेश खटके, तज्ञ संचालक दशरथ जाधव, अशोक तोंडले, एम.एस.सी. बँक प्रतिनिधी सी. एस. पाटील, श्री विठ्ठल प्रशालेचा स्टाफ तसेच कारखान्याचे सभासद, कार्यकर्ते, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. उपस्थित सर्व संचालक व मान्यवरांनी याप्रसंगी कै. चौगुले व कै. नरसाळे यांना श्रध्दांजली अर्पण केली.
0 Comments