प्रतीनिधी.--पंढरपूर,श्री सिद्धनाथ विद्यालय सातवा मैल कासेगाव तालुका पंढरपूर येथे इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत सर्व 132 विद्यार्थिनी व शिक्षक स्टाफ यांचे हिमोग्लोबिन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी भारत विकास परिषदेचे शाखा पंढरपूर चे माननीय आध्यक्ष डॉ. सुरेद्र काणे व महिला प्रांत सघटक डॉ.सौ. वर्षा काणे यांच्या मार्गदर्शनाखाली, सदस्य डॉ. अनिल पवार, सुनील परळीकर, राजेंद्र केसकर, जयंत अयाचित उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वंदेमातरम् नी करण्यात आली. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक जयंत आयाचित यांनी करून भारत विकास परिषद चे विविध शालेय, सामाजिक उपक्रम यांची माहिती दिली. डॉ अनिल पवार यांनी हिमोग्लोबिन तपासणी चे महत्व, आरोग्य, आहार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. राजेंद्र केसकर यांनी उपक्रम, शालेय शिक्षण याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील परळीकर यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार व्यक्त करून योग प्राणायाम चे फायदे सांगितले. ज्या विद्यार्थ्यांना ची हिमोग्लोबिन कमी असणाऱ्याना उपचारात्मक औषधाचे वाटप करून पुढील 3 महिन्यासाठी औषधे देण्याचे नियोजन करून दिले. सूत्र संचालन सहशिक्षक शिंदे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सह शिक्षक झांबरे सर यांनी केले. प्रशालेच्या वतीने सर्वांना अल्पोपहार व चहापान करण्यात आले. हिमोग्लोबिन तपासणी शिबीरासाठी एमक्युअर कंपनीचे कोळेकर सर यांच्या त्यांचाही सत्कार करण्यात आला व आभार मानले. प्रशालेचे सर्व स्टाफ चे उत्तम सहकार्य लाभले. प्रशालेच्या वतीने भारत विकास परिषदेचे आभार मानण्यात आले कार्यक्रम चा शेवट राष्टगिताने करण्यात आला.


0 Comments