आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या नूतन पदाधिकारी निवडी शिवसेना भवन मार्फत सामना मधून जाहीर झाल्या. त्याबद्दल नूतन पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ शिवसेना संपर्क कार्यालय, जुना कराड नाका येथे पार पडला.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा संपर्कप्रमुख मा. दिवाकरजी भटकळ साहेब यांच्या शुभहस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
युवासेना पंढरपूर उपतालुका युवा अधिकारीपदी प्रणित पवार व समाधान गोरे यांची निवड जाहीर झाली, पंढरपूर शहर युवा अधिकारीपदी श्रीनिवास उपळकर यांची निवड जाहीर झाली तर युवा सेना शहर समन्वयकपदी स्वप्निल गावडे तर पंढरपूर शहर उपयुवाधिकारी म्हणून अतिश काळे यांची निवड झाल्याबद्दल या सर्व नूतन पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
यावेळी प्रमुख उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पंढरपूर तालुकाप्रमुख संजय दशरथ घोडके, ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे, उमेश बापू काळे, शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे, बाळासाहेब देवकर, गुरुदेव अष्टेकर तसेच इतर शिवसेनेचे तथा युवा सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.


0 Comments