पंढरपूर (प्रतिनिधी)- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे मकर संक्रांतीचा उत्सव साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या उत्सवानिमित्त भोगीच्या दिवशी (शनिवार, दि. १४/०१/२०२३ रोजी) श्री रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा पहाटे ३ ते ४ या वेळेत करण्यात येणार आहे. भगिनींना श्री रूक्मिणी मातेस भोगी करावयाची असेल तर त्यांनी पहाटे ४ ते ५.३० या वेळेत करावी. त्यादिवशी पहाटे ५.३० नंतर श्री रूक्मिणी मातेस पोषाख व अलंकार घातले जातील. सकाळी ६.१५ वाजता पदस्पर्श दर्शन सुरू करणेत येईल, तसेच भाविकांच्या सोईच्या दृष्टीने दि. १६/०१/२०२३ रोजी श्री विठ्ठलाकडील काकडा आरती व नित्यपूजा पहाटे ४.३०
ते ५.४५ या वेळेत करणेत येईल. पदस्पर्श दर्शन पहाटे ५.४५ नंतर सुरू करणेत येईल.
दि. १५/०१/२०२३ रोजी मकर संक्रांतीनिमित्त जास्तीत जास्त भगिनींना श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन सुलभ व्हावे, याकरीता पुरूष भाविकांनी शक्यतो मुखदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिरे समितीच्यावतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केले आहे.


0 Comments