प्रतिनिधी ..मुंबई
आज उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सागर बंगला येथे भेट घेतली व त्यांना विठ्ठल रुक्माई ला प्रिय असलेला तुळशीहार विठ्ठलाची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला व विनंती केली की चंद्रभागा नदी विठ्ठलाच्या पायावर लोळण घेत सोलापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करीत पुढे जात आहे उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्याची वरदानी आहे
बारामतीचे दरोडेखोर उजनीच्या पाण्यावर दरोडा घालणार आहेत तुमच्याकडून सोलापूर जिल्ह्याच्या खूप अपेक्षा आहेत आपण ही योजना तात्काळ रद्द करावी व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती केली त्यावेळी बोलताना देवेंद्रजी म्हणाले की एक थेंबही पाणी जाऊ देणार नाही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही लवकरच एक बैठक लावून यावर निर्णय करू असे आश्वासन दिले यावेळी माऊली भाऊ हळणवर, मुबीना मुलानी, समाधान सुरवसे हनुमंत घाडगे रामभाऊ तरंगे यांच्यासह उजनी पाणी संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


0 Comments