पंढरपूर(प्रतिनिधी) पंढरपूर येथे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवन येथे आज गुरुवार दिनांक ६ जानेवारी रोजी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयतीनिमित्त पत्रकार दीन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे अप्पर जिल्हाधिकारी श्री तुषार ठोंबरे , ज्येष्ठ पत्रकार विलास उत्पात, सिध्दार्थ ढवळे, समाधान गायकवाड, जाकिर नदाफ, तानाजी जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना ठोंबरे म्हणाले, आताची पत्रकारिता खूप सोपी झाली आहे, सोशल मीडिया मुळे विविध प्रकारची माहिती तात्काळ मिळते,पण सखोल अभ्यास करायचा असेल तर वृत्तपत्र वाचणे अत्यंत गरजेचे असते.अग्रलेख आणि स्तंभ लेख वाचणे हे चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी अत्यावश्यक आहे. असे ते म्हणाले,तसेच पत्रकारांनी विविध विषयांवर अभ्यास करत पत्रकारिता केली पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा हार, फेटे, भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.






0 Comments