माॅ साहेब....मातोश्री. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती उत्सव म्हणजेच ' ममतादीन ' शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पंढरपूर तालुका व शहर च्या वतीने साजरा....
आज दिनांक ६ जानेवारी २०२३ हा दिवस तमाम शिवसैनिकांची मायमाऊली आणि वात्सल्याची सावली, हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती, शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व.मीनाताई ठाकरे यांची जयंती म्हणजेच ममता दिन आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पंढरपूर शहर व तालुका सेनेच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून तसेच विविध घोषणा देऊन करण्यात आली, त्यानंतर पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पंढरपूर शहर व तालुका पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
या नंतर आऊसाहेब जिजामाता यांच्या पुतळ्यास पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा सौ. उज्वलाताई भालेराव, ऍड.सुकेशीनी बागलं, डॉ. राजश्रीताई गुरव, व्होळे, सौ.अमृताताई बुराडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यानंतर स्व.मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस मान्यवर महिलांच्या हस्ते पुष्पहार घालून व प्रार्थना म्हणून विनम्र अभिवादन केले. तत्पूर्वी सकाळी ९ वाजलेपासून भजनाचा व गायनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी जेष्ठ समाजसेविका मा.मंगलाताई शहा, विरमाता सौ.वृंदाताई मुन्नागीर गोसावी, आदर्श शिक्षिका सौ.शोभाताई माळवे, प्रसिद्ध डॉ.राजश्री ताई गुरव, व्होळे, पंढरपूर च्या माजी नगराध्यक्षा सौ. उज्वलाताई भालेराव, माजी उपनगराध्यक्ष प्रमिलाताई कबाडे, लक्ष्मी टाकळीच्या माजी सरपंच सौ.नूतन रसाळे ताई, ऍड. सुकेशीनी बागल, मा.कल्पनाताई बेद्रे या सर्व महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये निवासी आश्रम शाळा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अश्विनी संदीप पितळे, अमृताताई बुराडे, वैष्णवी अष्टेकर, अर्पिता अमोल लोळगे, कलावती काळे, वैशाली गायकवाड, स्वाती गोरे, भक्ती घाडगे, राबिया ताई टिनमेकर, संगीता ताई पवार, मंजुळाताई धोडमिसे, प्रज्ञाताई भोसले, दिपालीताई पाटील, मंगलताई चव्हाण, सुशीला पुरुषोत्तम पवार, वर्णमालाताई जाधव, सोनाली विशाल जाधव, माधुरी सचिन शिंदे, रेखा रवींद्र शिंदे, गायत्री अमित गायकवाड, ऋतुजा श्रीनिवास उपळकर, करुणाताई माळवे, शरीफाभाबी पठाण आदी महीला भगिनीं यावेळी उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पंढरपूर तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके, जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे, बाळासाहेब पवार, उमेश बापू काळे, उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे, अनिल कसबे, महेश कांबळे शाखाप्रमुख तावशी गौसपाक आतार्, उपशाखाप्रमुख तावशी समाधान जगदाळे, जालिंदर तुकाराम शिंदे, विशाल डोंगरे राजाभाऊ अण्णा पवार, संदीप पितळे, प्रवीण भोसले, संजय राजमाने, दिलीप चांडोले, सुभाष जावळे, श्रीनिवास उपळकर, विशाल डोंगरे, बाळासाहेब देवकर, स्वप्निल गावडे, शाखा प्रमुख प्रणित पवार, गुरुदेव अष्टेकर, कैलास नवले, गणेश वाघमारे, विशाल डोंगरे, शेखर ननवरे यांनी परिश्रम घेतले.



0 Comments