LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपुरात अनाधिकृत बांधकामांना आलाय उत


पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर शहरातील अनेक भागांमधिल बांधकाम धारकांनी आपल्या बांधकामांचे पंढरपूर नगरपरिषद बांधकाम विभागाकडून वापर परवाने घेऊन बांधकाम परवाना घेतेवेळी नकाशा प्रमाणे बांधकाम  केलेले नाही. सर्रास नगरपालिकेकडून घेतलेल्या परवाना नकाशा मध्ये व प्रत्यक्ष बांधलेले बांधकाम या तफावत असल्याचे दिसून येते. यामध्ये पार्किंग महत्त्वपूर्ण असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यावरील नवीन बांधकामाला घेतलेले परवाने पार्किंग सहित आहेत तर प्रत्यक्षात मात्र या इमारतींना पार्किंगसाठी जागा न ठेवता ती जागा पैसे कमवण्यासाठी संबंधित मिळकत दाराकडून वापरली जात आहे त्यामुळे रस्त्यावर वाहने लावले जातात.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य आहेच मात्र आता या वाहनांमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असेल तर पंढरपूरची सक्षम नगरपालिका व नगरपालिकेच्या बांधकाम विभागातील अतिदक्ष अधिकारी व पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशा अनाधिकृत बांधकामांवर कारवाई का करत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्यांना करदात्या नागरिकांमधून निर्माण झाला आहे.

नगरपालिकेच्या दप्तरी काहीतरी काळे पांढरे करून वापर परवाना घ्यायचा संबंधित अधिकाऱ्याला आम्हीच द्यायचे व सदर पार्किंगच्या जागे व्यवसाय करायचा अशा सर्रास बिल्डिंग शहरातील प्रमुख रस्त्यांवर बांधले असल्याचे दिसून येत आहे वास्तविक पाहता या बिल्डिंगच्या तळमजल्यावर नगरपालिकेतून पार्किंगची सोय करणार असल्याचे परवाने घेतलेले आहेत तर सदर इमारतधारकांवर कारवाई करून शहरात होणारी वाहतूक कोंडी तात्काळ थांबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे

Post a Comment

0 Comments