वैभवजी बडवे यांची मुंबई क्रिकेट असोसिएशन "( MCA)च्या" सुपरवायजरपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून सत्कार
पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे, पंढरीचे सुपुत्र, आमचे मित्र श्री.वैभव जी बडवे याची मुंबई क्रिकेट असोसिएशन "( MCA)च्या" सुपरवायजरपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पंढरपूर तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके व जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे यांच्या शुभहस्ते मानाचा भगवा फेटा, भगवी शाल व पुष्पहार घालून आदर सत्कार करण्यात आला.
शिवसेना उप शहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांच्या शिवसेना संपर्क कार्यालय, जुना कराड नाका येथे हा छोटेखानी समारंभ संपन्न झाला.
यावेळी श्रीनिवास उपळकर, प्रणित पवार, कैलास नवले, गुरुदेव अष्टेकर, नागराज गायकवाड, मानसिंग बाबर, प्रमोद जगदाळे, विशाल डोंगरे, सौरव पवार, अभि पवार तसेच इतर मित्र परिवार यांनी उपस्थित राहून वैभवजी यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


0 Comments