पंढरीतील धुंडामहाराज देगलूरकर यांच्या नंतर प्रथमच निकते गुरुजींना मिळतोय मान.
पंढरपूर (प्रतिनिधी):- धर्म, संस्कृति व इतिहास यापैकी कुठल्याही क्षेत्रात व्रतस्थ जीवन जगून कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींना नागपूर-पुणे चे छत्रपती सेवा प्रतिष्ठान 'जिजमाता विद्वत गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करीत असते. गेल्या ४० वर्षापासून (१९८२पासून) हा पुरस्कार अखंडीतपणे दिला जात आहे. यावर्षी ४१ वा पुरस्कार पंढरपूरचे संत वाग्मयांचे गाढे अभ्यासक प्रकाश निकते गुरुजी यांना जाहीर करण्यात येत आहे. ५१ हजार रोख, सन्मान पत्र, सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ देऊन त्यांचे विद्वत पूजन करण्यात येणार आहे.
श्रद्धेय निकते गुरुजी हे संत नामदेव यांचे साहित्य भक्ति व प्रचार हेच आपले जीवित कार्य मानून गेली ५० वर्षे साहित्य भक्ति करीत आहे. त्यांनी नामदेव गाथा हा ग्रंथ संशोधन करून सिद्ध केला आहे. इतकेच नव्हे तर संत नामदेव महाराजांचे सामाजिक समरसतेचे विचार सर्वदूर घरोघरी पोहचवावे या हेतूने 'नामदेव गाथा' पत्राद्वारे अभ्यासक्रम सुरू करून संत नामदेव अभंग दैनंदिन चिंतनिका यांनी तयार केली आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा यापासून दूर राहून अतिशय निस्पृहतेने गुरुजी कार्य अजूनही करीत आहेत.
यंदा पुरस्काराचे हे ४१ वे वर्ष असून यापूर्वी या निमित्ताने डॉक्टर मिराशी, पंडित महादेवशास्त्री जोशी, सेतु माधवराव पगडी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, भालजी पेंढारकर, श्रद्धेय किसान महाराज साखरे, पू. धुंडामहाराज देगलूरकर, डॉक्टर म. रा. जोशी, पू. मुकुंदकाका जाटदेवळेकर, पंडित प्रवर गणेश्वर शास्त्री द्राविड, स्वरभारती भारतरत्न लता मंगेशकर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आहे.
हा जेष्ठ शु. त्रयोदशी दिनांक २ जून २०२३ रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे छत्रपति सेवा प्रतिष्ठान चे तसेच गुरुमंदिर परिवाराचे संस्थापक धर्मभास्कर प. पू. सद्गुरुदास महाराज पुर्वाश्रमिचे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिवचारित्रकार विजयराव देशमुख यांच्या उपस्थितीत तसेच मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत शनैश्वर मठामध्ये संपन्न होणार आहे.
0 Comments