LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

अभिनेता महेश मांजरेकर यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी,याकरीता तहसीलदारांना दिले निवेदन

पंढरपूर प्रतिनिधी 


 बँड बँजो कलाकार संघटना महाराष्ट्र राज्य, पंढरपूर शाखेच्या वतीने सिने अभिनेता महेश मांजरेकर यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी यासाठी पंढरपूर येथे आंदोलन करण्यात आले.  यावेळी येथील  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास  पुष्पहार घालून  घोषणा देत तहसीलदार  यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी बँड पथक वाजवून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थित  प्रदेश अध्यक्ष प्रा.अशोकराव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले आणि महेश मांजरेकर यांचा जाहीर निषेध केला. सांगली जिल्हाध्यक्ष अरुणकुमार तेरदाळे यांनी महेश मांजरेकर यांनी जर कलाकारांची जाहीर माफी नाही मागीतली तर याही पेक्षा खूप मोठं आंदोलन उभ करू अशी माहिती दिली. यावेळी उपस्थित ,सुभाष अडागळे प्रदेश सरचिटणीस  आनंदराव भोंडवे प्रदेश संघटक, गणेशराव साळुंखे कोरेगाव ता. अध्यक्ष दत्तात्रय जाधव  प्रदेश सचिव,  पंढरपूर तालुका अध्यक्ष मारुती प्रक्षाळे ,गडशी समाज अध्यक्ष प्रकाश वनारे,नाथा प्रक्षाळे,पंढरपूर होलार समाज अध्यक्ष बिरदेव केंगार,सांगोला तालुका अध्यक्ष सुशीलकुमार मागाडे,करमाळा अध्यक्ष झाकीरभाई,पिंटू सावंत,बापू वनसाळे, अंबादास वनारे, अमर वनारे, गौरव भोसले, अनिल धुमाळ, नागनाथ भोसले, सुरज भोसले,भोसले सुभाष जगदने, इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments