पंढरपूर (प्रतिनिधी)
मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असा नाट्यगृहाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सरकारकडून मंजूरी देवून सुरवातीला निधी उपलब्ध करून दिला. मंजूर झालेल्या निधीमधून सदर नाट्यगृहाचे बांधकाम काही प्रमाणात पुर्ण झाले आहे.
पंढरपूर शहरात नामसंर्कीतन सभागृह बांधकामाच्या कामास ऑक्टोबर २०१६ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून मंजूरी मिळाली होती. सदर कामाची एकुण अंदाज पत्रकीय किंमत रू.३९.४७ कोटी होती.
परंतू मागील सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये व कोव्हिड काळात याकामास कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध होवू शकला नसल्यामुळे नामसंर्कितन सभागृहाचे काम गेली तीन वर्षापासून रखडलेले आहे. त्यामुळे सध्याच्या कामाच्या अंदाज पत्रकामध्ये वाढ झाली आहे. आता पर्यंत २५ कोटी इतका निधी पंढरपूर नगरपरिषदेस प्राप्त झालेला आहे. प्राप्त झालेल्या निधीतून झालेल्या कामाची बिले देणेत आलेली आहेत. राहिलेल्या सभागृहाचे काम पुर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पकीय अधिवनेशनामध्ये निधीची तरतुद करावी यासाठी मा.आ.प्रशांत परिचारक यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेवून मागणी केली.
प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यातील नामंसर्कितन सभागृहाचे विद्युत व्यवस्था, ऑडिटोरियमच्या अंतर्गत भागातील व्यवस्थेची संबधित कामे, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा व्यवस्था, अंतर्गत रस्ते, लँडस्केपिंग इ. कामे करणेची असून त्याचे ब्लॉक इस्टीमेट ६९ कोटी इतके झालेले आहे. काम पुर्ण करण्यासाठी ४४ कोटी रूपये निधीची आवश्यकता आहे.
मा.आ.प्रशांत परिचारक यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेवून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधीची तरतुद करून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
0 Comments