पंढरपूर (प्रतिनिधी)
दिनांक८ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या माहितीवरून वनपरिक्षा पंढरपुर अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील मोज मारोळी येथे तरस (न) हा वन्यप्राणी अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत आढळून आलये निदर्शनास आलेले आहे.
सदर घटनास्थळी श्री. बी. जी. हा सहाय्यक वनसंरक्षक (कम्मा) सोलापूर श्रीमती सी. एस या वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पंढरपूर श्री. एम. टी. मेरगेवाड वनपाल मंगळा, श्री वी. ही गोल वनरक्षक सलगर, श्रीमती पी.के. खेणे वनरक्षक हुलजंती, श्री भागवत मासाळ, श्री. किसन कावळ, नमन श्री भरत खडा मानद वन्यजीव रक्षक सोलापूर यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून सदरचा वन्यप्राण्यास रेस्क्यू करून ताब्यात घेऊन वेदयकीय उपचाराकरिता पशुवैदयकीय अधिकारी मंगळवेढा वर्ग येथे दाखल करण्यात आल आहे. सदरच्या वन्यप्राण्यावर डॉ. श्री. ब्रम्हानंद कदम पशुवैदयकीय अधिकारी हे उपचार करत असताना उपचारदरम्यान तरस या वन्यप्राण्याचा मृत्यू झालेला असून श्री ब्रम्हानंद कदम पशुवैदयकीय अधिकारी मंगळवेढा वर्ग यांनी तरस वन्यप्राण्याचे सर्वांचे समक्ष शवविच्छेदन करून शासकीय नियमाप्रमाणे दहन 1 करणेत आले.
मा. श्री. धैर्यशिल पाटील उपवनसंरक्षक सोलापूर, श्री.बी.जी.हाके सहाय्यक वनसंरक्षक (कम्पा) सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती सी.एस. वाघ वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पंढरपुर, श्री. डी. एम. कोकर वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) माळशिरस तसेच पंढरपूर रेस्क्यू टिम मधील वनपाल व वनरक्षक यांनी या पथकान मोज मारोळी गावामध्ये जाऊन चौकशी केली असता आरोपी नामे श्री चंद्रकांत गुराप्पा हिंचगिरे 2. श्री. आमसिध्द संगप्पा लवंगी 3. श्री. मलकारी चंद्रकांत हिंचगिरे 4. शिवानंद हत्ताळी. 5. श्री. शैल शंकर जमखंड या पाच आरोपीचा समावेश असून श्री. शैल शंकर जमखंडे वय वर्ष 30 रा. मारूळे ता. मंगळवेढा जि. सोलापूर या आरोपीस ताब्यात घेणेत आलेले असून उर्वरीत चार आरोपी फरार असून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. सदर अवध्य वन्य प्राण्याची शिकार केले प्रकरणी आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी करून त्याच विरूध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 2 (16) 2 (39) 9, 39 (अ) 39 (2), 30 (3) 49 अ
(अ) अन्वये प्राथमिक गुन्हा क्रमांक WLP 01 /2023 दिनांक ९ फेब्रुवारी अन्वये वनगुन्हा दाखल करणेत आलेला आहे. तरस या वन्यप्राण्यास लोकांनी गंभीर जखमी केल्याने अंतर्गत रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला असावा असा
प्राथमिक अंदाज आहे. तरस वन्यप्राणी हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत अधिसुचि १ मध्ये समाविष्ट असून
अन्नसाखळीतील तो एक महत्वाचा घटक आहे.
सदरची कारवाई मा. श्री. धैर्यशल पाटील उपवनसंरक्षक सोलापूर. श्री.बी.जी. हाके सहाय्यक वनसंरक्षक (कॅम्पा) सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती सी. एस. वाघ वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पंढरपूर, वनपरिक्षेत्र श्री. डी. एम. कोकर वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) माळशिरस तसेच पंढरपूर रेस्क्यू टिम मधील वनपाल व वनरक्षक या पथकाची कारवाई सदयस्थितीमध्ये चालु आहे.
वरील श्री. शेल शंकर जमखंडे वय वर्ष ३०रा. मारूळे ता. मंगळवेढा जि. सोलापूर या आरोपीस दिनांक १० फेब्रुवारी रोजी मा. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मंगळवेढा यांचे समक्ष उपस्थित केलेले आहे. सदर वनगुन्हे प्रकरणाचा पुढील तपास श्री मा. श्री. धैर्यशिल पाटील उपवनसंरक्षक सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.बी.जी. हा सहाय्यक वनसंरक्षक (कंम्पा) सोलापूर हे करित आहेत.
0 Comments