फोटो ओळ : डॉक्टर हनुमंत खपाले यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतर पदाधिकारी.
प्रतिनिधी पंढरपूर -
राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील डॉ. हनुमंत खपाले यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्या आदेशाने व डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुनील जगताप, प्रदेश सचिव डॉ. अमरसिंह जमदाडे, जिल्हाध्यक्ष डॉ. अमरजीत गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर खपाले यांची निवड करण्यात आली आली असून सोलापूर येथील पार पडलेल्या पदाधिकारी मेळाव्यात डॉक्टर खपाले यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, राजन पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील , युवक जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील, ओबीसी सेलचे लतीफ भाई तांबोळी, युवराज पाटील, भगिरथ भालके, तालुकाध्यक्ष सुधीर भोसले पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
नूतन जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर खपाले यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकारी यांनी जो आपल्यावर विश्वास टाकला आहे तो विश्वास आपण आपल्या कार्यातून सार्थक ठरविणार आहोत. तर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकारी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.
0 Comments