
पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर शहर व परिसरात भांडणे, मारामाऱ्या, दमदाटी असे गैरप्रकार वाढतं असून पोलिसांचा वचक राहिला नाही, तालुक्यातील वाडिकुरोली येथे शेत जमिनीच्या वादातून एका आर पी आय नेत्यावरच हल्ला करण्यात आला. तसेच शेतजमिनीच्या वादातून पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात दोन पक्षकारांमध्ये झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत. यासंदर्भात दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सचिन नामदेव चव्हाण (वय ४३ वर्षे, रा. सुस्ते, तालुका पंढरपूर) हे आणि त्यांचा मुलगा सुयश सचिन चव्हाण जिल्हा सत्र न्यायालयात शेतजमिनीच्या वादासंदर्भात तारीख असल्याने आले होते. कोर्टाच्या आवारामध्ये गाडी लावून कोर्टामध्ये जात असताना दुसरा वादी असलेल्या बाबू निवृत्ती जाधव याने फिर्यादी सचिन चव्हाण यांच्या डोक्यात दगड मारला तसेच उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोट चावा घेऊन जखमी केले. त्याचबरोबर मुलगा सुयश सचिन चव्हाण यास रमेश बाबू जाधव याने लाथाबुक्क्याने मारहाण केली. शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. सचिन नामदेव चव्हाण यांच्या तक्रारीवरून पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्मायान मागील पंधरवड्यात भटूबरे पुलावर वाळू वाहतूक स्पर्धेतून एका युवकाला जबर मारहाण करण्यात आली तर संत पेठ भागातील एका नऊ वर्षाच्या निष्पाप निरागस बालकाचा विचित्र पद्धतीने मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. चार दिवसांपूर्वी गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या शेगाव दुमाला येथील एका युवकाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडे दोन देशी पिस्तूल सापडल्याने पंढरपूर आता, गँग्ज ऑफ वासेपूर,सारखे वासेपूर होते काय? अशी शंका येत आहे.
पंढरपूर शहर शांततामय ठेवण्यात पोलिसांना मात्र सपशेल अपयश आले असल्याचे दिसत आहे. पंढरपूर शहरातील वाढती गुन्हेगारी भुरटे दादा याचे प्रमुख कारण म्हणजे अवैध धंदे पंढरपूर शहरातील व तालुक्यातील राजरोसपणे सुरू असणारे अवैध धंदे पोलीस बंद करू शकत नाहीत. अनाधिकृत पद्धतीने चालणाऱ्या भीशा, व्याजबट्टा करणारे सावकार दिवसेंदिवस होणारे वाळू चोरी यातून कमी वेळात जास्त पैसे मिळवण्याची तरुणांमध्ये असणारी क्रेज वाढत चालली आहे. तर याच पैशाचा उपयोग कळत नकळत गुन्हेगारी क्षेत्रात केला जातो तसेच पैशाची उब असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पोलिसांना धजावत नसल्याचे दिसत आहे. हे पंढरपूर शहर व तालुक्यातील पोलिसांचे अपयश असल्याचे दिसून येते पोलिसांचा धाक राहिला नाही त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत असल्याचे दिसत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून पंढरपूरकरांना मोठ्या अपेक्षा होत्या मात्र त्याही अपेक्षा धोळीत मिळाले असल्याचे दिसून येते त्यांच्याकडूनही कोणतीच मोठी कारवाई केल्याचे दिसत नाही यामुळे आता पंढरपूर शहरात खुद्द पोलीस अधीक्षक यांनीच लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांपुढे मोठ्या आव्हान ठेवले आहे हे आव्हान वेळीच हाताळले नाही तर पंढरपूर शहरात गुन्हेगारी करणारे लोक पंढरपूरकरांच्या व पोलिसांच्या डोक्याला ताप झाल्याशिवाय राहणार नाही.
0 Comments