LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सुरेश होरणे यांचे निधन



पंढरपूर– येथील सुरेश तुळशीदास होरणे (वय-८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सूना, जावई, नात जावई, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे. ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे व मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या अंत्ययात्रेत परिसरातील सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते. कै होरणे हे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रसिद्ध पितळी मूर्ती व कळसाचे व्यापारी होते. तसेच पंढरपूर अर्बन बँकेचे मा.संचालक व श्री.कालिकादेवी संस्था, पंढरपूरचे विश्वस्त सोमनाथ होरणे यांचे ते वडील होत. 

छायाचित्र – कै.सुरेश तुळशीराम होरणे.

Post a Comment

0 Comments