LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भंडीशेगाव येथे रस्ता रोको...

 


पंढरपूर -शेतकरी जागृती अभियान यांच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील वीज तोडणी तात्काळ थांबली पाहिजे, विज बिल शंभर टक्के माफ झाले पाहिजे, डीपी 24 तासात दुरुस्त करून मिळावा, कायमस्वरूपी शेतकऱ्यांना वीज मोफत मिळावी अशा प्रमुख मागण्यासाठी भंडीशेगाव येथे रस्ता रोको संपन्न झाला... आमच्या मागण्या मान्य न केल्यास शिंदे फडणीस सरकारला एकाही मंत्र्याला रस्त्यावरून फिरू देणार नाही काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला जाईल असे समाधान फाटे यांनी मत व्यक्त केले... तसेच या सरकारला व विरोधी पक्षाला शेतकऱ्याचे काही देणंघेणं नाही असं वाटत आहे असं मत माऊली जवळेकर यांनी केले...


यावेळी शेतकरी संघटनेचे समाधान फाटे, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर, प्रहार संघटनेचे संजय जगताप, पार्थ सुरवसे, शाहजीनाना जगदाळे, माजी उपसरपंच विश्वास सुरवसे, अमोल सुरवसे, तात्या नागणे विजय कदम हनुमंत सुरवसे रमेश शेगावकर मंगेश ननवरे आनंदा शेगावकर संतोष ननवरे संतोष भोसले संतोष यलमार आनंदा शेगावकर रामकृष्ण कवडे विजय सुरवसे मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments