न्यु सातारा समुह मुंबई संचलित न्यु सातारा पॅालिटेक्निक कोर्टी ता. पंढरपूर येथे सालाबादप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याकरिता व संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम महादेव निकम यांच्या संकल्पनेतून ‘स्वरतरंग २०२३’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन दि. १० व ११ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कोर्टी ग्रामपंचायत उपसरपंच मा. श्री. महेश येडगे, माजी प्राचार्य ग्रीन फिंगर्स कॉलेज, अकलूज मा. श्री. एस. एल. पडवळ, न्यु सातारा समुह मुंबई संचालक मा. श्री. लक्ष्मीकांत निकम, मा. श्री. नारायण वरे, संस्था प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर शेडगे, प्राचार्य श्री. विक्रम लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. एन. एन. तंटक, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. विशाल बाड, सर्व विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब ननवरे, प्रा. विक्रम माळी, प्रा. नितीन कलागते, प्रा. विश्वनाथ कुंभार, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. सचिन पुरी तसेच सर्व शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
१० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी ‘पारंपारिक वेशभूषा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यवेक्षक म्हणून प्राचार्य श्री. विक्रम लोंढे, प्रा. विक्रम माळी, प्रा. विश्वनाथ कुंभार व प्रा. कु. कोमल कांबळे यांनी काम पाहिले. तसेच त्याच दिवशी दुपारी ‘शेलापागोटे’ वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला व या कार्यक्रमाचा सर्व विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.
११ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी सहभागी विद्यार्थ्यांनी ‘मिस मॅच डे’ या कार्यक्रमासाठी सादरीकरण केले व ‘फनी गेम्स’ व ‘फूड स्टाँल’ या कार्यक्रमाचा आनंद घेतला. संस्कुतिक कार्यक्रमाच्या दिवशी सायंकाळी विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्काराचे उत्स्फुर्थ्पणे सादरीकरण केले. काही अप्रतिम नृत्य व गायनाला उपस्थित विद्यार्थी व पालकांनी भरभरुन प्रतिसाद दिला यावेळी मराठमोळी लावणी, हिंदी व मराठी गाणी व नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केली तसेच समाजप्रबोधन अंतर्गत लघु नाटिका सादर केल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर शेडगे, प्राचार्य श्री. विक्रम लोंढे, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. सचिन पुरी व सांस्कृतिक विभागाचे सर्व सदस्य प्रा. कु. कोमल कांबळे, प्रा. इंद्रजीत जाधव, प्रा. कु. अर्चना सातपुते, प्रा. कु. नम्रता बनगोसावी, प्रा. गणेश लोखंडे, प्रा. सुरज जैस्वाल तसेच सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन पुरी व प्रा. लक्ष्मीकांत जोशी यांनी केले. ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. विशाल बाड यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
0 Comments