पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन ऐतिहासिक शस्र, मोडी लिपी, तोफा यांच्या प्रदर्शनास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे.
अशी माहिती या प्रदर्शनाचे आयोजक श्री सुनंजय पवार यांनी दिली, शिवप्रेमी युवक, नागरिकांना शिवकालीन इतिहास माहीत होण्यासाठी पंढरीत प्रथमच अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सलग तीन दिवस पाहण्यासाठी प्रदर्शन स्टेशन रोड येथील जाधवजी जेठाभाई सभागृहात आयोजित करण्यात आले होते,या अनोख्या प्रदर्शनास सुमारे १३ हजार लोकांनी भेट देऊन जणू शिवकाळ अनुभवला, याबाबत अनेक लोकांनी उत्तम प्रतिक्रिया दिल्या असून पंढरीत असे प्रदर्शन कायम होत रहावे अशी मागणी केली आहे.
या प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी,कट्यार,वाघनखे,कुकरी,चिलखत, पोलादी तोफा, ढाल,गोफण, मोडी लिपीतील विविध पत्रे, सागरी किल्ल्या विषयी माहिती याबद्दल विशिष्ठ माहिती दिली. सोलापूर शहर मध्य आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थी,विद्यार्थिनी,युवक तसेच सर्व वयोगटातील नागरिकानी याचा लाभ घेतला.


0 Comments