LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरीत संजय बाबांच्या मदतीपुढे अपंग, अनाथालाही फुटले अश्रू

 

अपंग व अनाथ असलेल्या तरुणाच्या आजीवन  भोजनाची केली सोय



पंढरपूर:- तीर्थक्षेत्र पंढरी नगरी मध्ये समाजकार्यात स्वतःला झोकून देणाऱ्यांची कमी नाही. परंतु संजय बाबा ननवरे या समाजसेवकांनी मात्र शहरातील अनाथ अपंग असलेल्या तरुणाची आजीवन भोजनाची सोय केल्याने संबंधित अपंग व अनाथ असलेल्या तरुणालाही फुटले अश्रू 


लहानपणीच  आई-वडिलांची छत्रछाया हरपलेला पंढरपूर शहरातील गोविंदपुरा येथे राहणारा गजानन दत्तात्रय शिंदे या अनाथ व अपंग असलेल्या तरुणाला शरीराच्या अपंगत्वामुळे कोणतेही काम करता येत नाही स्वतःची हालकीची परिस्थिती असल्याने व कोणतेही काम करता येत नसल्याने सदर युवकाला दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था होत नव्हती परंतु पंढरपूर शहरातील प्रत्येक गोरगरिबाला मदतीचा हात देणारे व समाजकार्यात स्व:ताला झोकून देणारे संजय बाबा ननवरे यांना अपंग व अनाथ असलेल्या गजानन शिंदे यांनी फोन करून आपल्या हालाखीच्या परिस्थितीची जाणीव करून दिली त्याचबरोबर मदत करण्याची विनंती करताच समाजसेवक संजय बाबा यांनी कोणताही विचार न करता त्याला भेटण्यास त्याच्या घरी पोहोचले त्या ठिकाणी परिसरातील लोकांकडून गजानन शिंदे या अपंग व अनाथ असलेल्या तरुणाची माहिती घेऊन त्याला दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली. परंतु ही व्यवस्था काही दिवसापूर्ति नसून आजीवन म्हणजेच जोपर्यंत सदर अनाथ व अपंग व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करून आगळे वेगळे समाजकार्य केले. त्यांच्या या समाज कार्यामुळे परिसरातील लोकांनी त्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले परंतु सर्वांच्या मध्ये उपस्थित असलेला अपंग व अनाथ गजानन शिंदे याला मात्र आश्रू अनावर झाले. एका शब्दात आपण माझी आयुष्यभराच्या पोटाची व्यवस्था केली त्यामुळे मला साक्षात पांडुरंग भेटल्याची जाणीव होत आहे अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments