पंढरपुरातील तुकाराम चव्हाण यांच्या कलाकृतीची होतेय सर्वत्र चर्चा
पंढरपूर-(प्रतिनिधी)
महाशिवरात्रीनिमित्त पंढरपुरातील तरूणाच्या डोक्यातील केसांमध्ये भगवान शंकराची गळ्यातील नागासह अगदी हुबेहुब प्रतिमा ओके हेअर ड्रेसेसचे मालक तुकाराम चव्हाण यांनी साकारली असून सध्या ही कलाकृती चर्चेचा विषय ठरली असून त्यांच्या कामाचे अनेकांतून कौतुक केलेले आहे.
याबाबत तुकाराम चव्हाण म्हणाले की, मी यापुर्वी महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल, श्री गणेश, संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे, वर्ल्डकप, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, भारत देशाचा नकाशा, रिक्षा, फुटबॉल आदि कलाकृतीने डोक्यातील केसांमध्ये साकारलेल्या आहेत. तरी याही पुढे आणखी नवनवीन प्रतिमा साकारून आपला छंद जोपासणार असल्याचे त्यांनी सांगितले.


0 Comments