पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची कामे वेगात सुरू झाली असून रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य आदींसाठी आपण निधी मागण्यास कुठे कमी पडू नका . असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सोमनाथ आवताडे यांनी केले आहे.
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा आवताडे यांनी आपल्या मतदारसंघात सध्या रस्ते ,वीज पाणी ,शिक्षण आरोग्य, आदी कामांना भरघोस असा निधी आणला आहे. आज दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील खंडोबा वस्ती ते बाळू चव्हाण वस्ती रस्त्याचे भूमिपूजन सोहळा
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी सभापती महोदय यांनी बोलताना सांगितले की, आपण कामे मागण्यास कुठे कमी पडू नका आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार समाधान दादा आवताडे यांनी मतदारसंघात जनतेच्या गरजा लक्षात घेता पाणी, रस्ते ,वीज आरोग्य, शिक्षण आदि कामे सुरू केली आहेत.
सदर प्रसंगी श्री. दिगंबर पवार सर, श्री.किसन पवार,सरपंच श्री.अशोक चंदनशिवे, उपसरपंच बाळासो पवार, श्री अंकुश चव्हाण श्री रमेश चंदनशिवे मेंबर श्री शंकर चंदनशिवे, श्री रामभाऊ पवार, श्री गोपीनाथ पवार, श्री विश्वजीत पवार, श्री.सुधाकर जाधव -पाटील,श्री.अजित पवार, श्री.पांडुरंग चव्हाण, श्री.दीपक जाधव मेंबर, श्री.सागर खरात, श्री. दिगंबर यादव मामा, खरात कॉन्ट्रॅक्टदार, श्री मुखरे भाऊसाहेब, श्री साहेबराव चंदनशिवे, श्री प्रकाश पवार,श्री.विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.


0 Comments