LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

श्री. विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेच्या चंदन उटी पूजा दि २३ मार्च ते ६ जून या कालावधीत संपन्न होणार.

 


पंढरपूर (प्रतिनिधी)

श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेच्या चैत्र शुध्द १ ते मृग नक्षत्र निघेपर्यंत श्रींना चंदन उटीपूजा करण्याची संधी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार या वर्षी दि.२३/०३/२०२३ ते ०६/०६/२०२३ या कालावधीमधील (यात्रा/सण / गर्दीचे दिवस वगळून) इतर दिवशीच्या चंदन उटीपूजा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मा. सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर मा. कार्यकारी अधिकारी श्री. तुषार ठोंबरे यांनी दिली.


श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेच्या दि. २३/०३/२०२३ ते ०६/०६/२०२३ या कालावधीतील चंदन उटीपूजेस श्री विठ्ठलाकडे २१०००/- व श्री रूक्मिणी मातेस ९०००/- असे एकूण ३०,०००/- इतके मूल्य आकारण्यात येणार आहे. याबाबत मंदिरे समितीच्या नित्योपचार उपसमितीच्या दि. १८/०२/२०२३ रोजीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस मा.सदस्य श्रीमती शकुंतला नडगिरे, ह. भ. प. श्री. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ह.भ.प. श्री. प्रकाश जवंजाळ तसेच कार्यकारी अधिकारी श्री. तुषार ठोंबरे, व्यवस्थापक [ श्री. बालाजी पुदलवाड, लेखा अधिकारी श्री अनिल पाटील व अनुपालन अधिकारी श्री. संजय कोकीळ उपस्थित होते.


सदरच्या चंदन उटीपूजेचे अर्ज स्वीकारण्यास दि. ०३/०३/२०२३ पासून सुरूवात करण्यात येणार


आहे. सदरच्या चंदन उटीपूजेचे अर्ज मंदिरे समितीच्या कार्यालयात व https://www.vitthalrukminimandir.org


या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच ज्या भाविकांना श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर, श्रीक्षेत्र पंढरपूर


येथे समक्ष उपस्थित राहून पूजा बुकींग करता येणार नाही, अशा भाविकांनी मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून

अर्ज डाऊनलोड करून eotemple@gmail.com या ई मेलवर किंवा पोष्टाने पाठविणेत यावेत. असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments