पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यातील शिरगाव येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी सभापती सोमनाथ आवताडे हे आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की,कुठल्याही विकास कामात राजकारण न आणता वाडी-वस्ती,वार्डातील,गावातील आमदार समाधान दादा आवताडे यांच्या माध्यमातून पाणी,रस्ते,वीज,शाळा,आरोग्य आदी कामे करून घेण्याचे आवाहन केले .
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान (दादा) आवताडे यांच्या माध्यमातून शिरगाव येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.त्याप्रसंगी पंढरपूर-मंगळवेढा युवक नेते कृषी उत्पन्न बाजार समिती बेस्ट सभापती सोमनाथ आवताडे जि.प.सदस्य वसंत (नाना) देशमुख,विठ्ठल कारखाना माजी चेअरमन भगीरथ भालके,युवा नेते प्रणव परिचारक,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.


0 Comments