LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीमध्ये ‘राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह’ संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 'इन्स्टिट्युशन्स इनोव्हेशन कौन्सिल' (आयआयसी), मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग व ‘मेसा’ तथा मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय उत्पादकता दिवस’ अनुषंगाने दि. १२ फेब्रुवारी २०२३ ते दि. १८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये ‘राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह’ नुकताच संपन्न झाला.

         ‘राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह’ हा उपक्रम  स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम. पवार, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, संशोधन अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे, प्लेसमेंट अँड कॉर्पोरेट अफेअर्स अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे आणि मेकॅनिकल इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर यांच्या संकल्पनेमधुन हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. श्रीकृष्ण भोसले यांनी ‘उत्पादकता, हरित वाढ आणि टिकाऊपणा’, श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रा.संदीपराज साळुंखे यांनी ‘सुरक्षा आणि सावधानता’, एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. किरण लक्कम यांनी ‘श्रम उत्पादकता’, त्याचप्रमाणे या परिसरातील माध्यमिक शाळेच्या लहान मुलांसाठी डॉ.सचिन सोनवणे यांनी ‘राष्ट्रीय उत्पादकता दिवस आणि त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होतो’, सर्व शिक्षकांसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा.अविनाश मोटे यांनी ‘सूक्ष्म सवयी- उत्पादकता सुधारण्यासाठीचे मार्ग’, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वर्कशॉपचे इन्चार्ज प्रा.बी.डी. गायकवाड यांनी ‘कंटाळवाणा: उत्पादकतेचा सर्वात मोठा शत्रू’ या विषयांवर विशेष मार्गदर्शन पर व्याख्याने  दिली. ‘राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह’ या तब्बल आठवडाभर चाललेल्या कार्यक्रमात स्वेरीच्या प्राध्यापकांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले ज्यामुळे सहभागी स्टाफला दैनंदिन जीवनात याचा खूप फायदा झाला. प्रा.सचिन काळे व प्रा. चेतन जाधव यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले तर तांत्रिक व्यवस्थापनाचे काम बालाजी सुरवसे यांनी पाहिले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments