पंढरपूर ( प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यातील वाखरी ग्रामपंचायत येथील अनंता बाबूराव माने यांच्या गट नं ४१७ तील ५२ एकर या शेतजमीनिच्या व्यवहारातील दोन वेगवेगळे दस्त समोर आल्याने माने यांनी पंढरपूर येथिल दुय्यम निबंधक कार्यालय येथे याबाबत माहिती अधिकार अर्ज करुन त्याबाबत माहिती मागितली होती त्यानुसार माने यांना पंढरपूर दुय्यम निबंधक कार्यालयाने झालेले दस्त तपासण्याची जबाबदारी नोंदणी कार्यालयाची नसून संबंधित दोन दस्ताबाबत आपण योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याचे सुचित केले असल्याने माने यांनी या प्रकरणी आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे



0 Comments