LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चारित्र्यावर संशय घेवून पत्नीचा खून आरोपातून पतीची निर्दोष मुक्तता

 पंढरपूर (प्रतिनिधी)  पंढरपूर तालुक्यातील करकंब  येथे ४० वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तसेच व्यसनासाठी पैसे देत नाही.

 म्हणून पंढरपूर येथील जुना सोलापूर नाका येथील राहत्या घरी पत्नी एकटी घरी असताना संध्याकाळी पत्नीच्या डोक्यात कुन्हाडीने वार करून खून केल्याची घटना पंढरपूर येथे सन २०२० साली घडली होती. सदर खून खटल्याची सुनावणी पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय यांचे कोर्टात झाली. सदर खटल्यातून जिल्हा न्यायाधिश एम. बी. लंबे साहेब, यांनी आरोपीची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.

   पंढरपूर शहरातील जुना सोलापूर नाका येथील लोक वस्तीच्या ठिकाणी राहत्या घरी ११ नोव्हेंबर २०२० रोजी बाबा लक्ष्मण सावतराव यांनी त्यांची पत्नी राधीका यांचा खून केल्याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता, या गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी  विक्रम कदम यांनी करून आरोपी विरोधात कलम ३०२ प्रमाणे चार्जसिट दाखल केले. तेंव्हापासून आरोपी बाबा सावतराव हे न्यायालयीन कोठडीत होते. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान एकुण १० साक्षीदारांची सरकार पक्षातर्फे साक्ष नोंदविण्यात आली. सरकार पक्षाचा साक्ष पुरावा सबळ नसल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. याकामी आरोपी तर्फे  अॅड. एम. बी. शिंदे यांनी युक्तीवाद मांडला सर्व बाबींचे अवलोकन करून न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. सदर खटल्याचे कामी आरोपी तर्फे अॅड. एम. बी. शिंदे, अॅड. नानासाहेब शिंदे, अँड. के.बी. मेटकरी यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments