भालके गटाचे ईश्वर वठार ग्रामपंचायत सदस्य मा.श्री बाळासाहेब खांडेकर यांच्यासह संजय देशमुख व अनेक कार्यकर्त्यांनी अभिजीत पाटील गटात प्रवेश केला
पंढरपूर( प्रतिनिधी):-
पंढरपूर तालुक्यातील सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि. भाळवणी निवडणूक रणसंग्राम गाव भेट दौऱ्यानिमित्त विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील
हे गावभेट दौऱ्यानिमित्त नारायण चिंचोली येथे भालके गटाचे ईश्वर वठार ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब खांडेकर यांच्यासह संजय देशमुख व अनेक कार्यकर्त्यांनी अभिजीत आबा पाटील गटात प्रवेश केला.
यावेळी डॉ. बी पी रोंगे , दीपक पवार, सुरेश सावंत, दिनकर दाजी चव्हाण,ईश्वर वठारचे माजी सरपंच नारायण भाऊ देशमुख, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक धनंजय नाना घाडगे, माजी सरपंच रामहरी नाना लोंढे, रायप्पा हळनवर ,ईश्वर वठार चे जनतेचे सरपंच विजय अण्णा मेटकरी , लक्ष्मण कोल्हे, अभिजीत कवडे, एल एस पाटील,सुरेश खांडेकर, रावसाहेब देशमुख, संतोष चव्हाण, ज्योती वसेकर ,दत्तात्रय खांडेकर, रामा हळनवर, महादेव खांडेकर, रवी ठवरे ,शिवा सलगर ,नारायण चिंचोली चे माजी सरपंच संपताना कोळेकर ,श्रीकांत नलावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते


0 Comments