पंढरपूर(प्रतिनिधी)- राष्ट्रीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत अनवली ता. पंढरपूर येथील चि. सार्थक अनिल बारले याची सुवर्ण पदकासह रौप्य पदकाची कमाई !
नॅशनल स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया नवी दिल्ली (नोएडा) यांच्या वतीने 6 जून ते 12 जून 2023 दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 66 व्या राष्ट्रीय शालेय ओपन साईट रायफल शूटिंग स्पर्धेत 19वर्षे वयोगटात अटीतटीच्या लढतीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सार्थक याने सुवर्ण पदकासह देशात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला .
त्याचबरोबर त्याने साखळी सामन्यातही महाराष्ट्र टीमसाठी रौप्य पदकाची कमाई करून दुहेरी पदक पटकविण्याचा विक्रम नोंदविला.
महाराष्ट्र टीम पुणे येथील दि.1जून ते 3जून दरम्यान पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण पूर्ण करून टीम महाराष्ट्र दिल्लीत दाखल झाली. दि.6जून दिल्लीतील नोएडा येथील छत्रसाल स्टेडियम येथे पार पडलेल्या उद् घाटन समारंभास उपस्थित राहून ओळखपरेड मध्ये सहभाग घेऊन महाराष्ट्र टीम ने उत्कृष्ट संचलन केले. या कार्यक्रमासाठी देशभरातील 29 राज्य व केंद्रशासित प्रदेशातील मिळून 36संघांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक संघाने आपापल्या राज्याचे नेतृत्व करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. आकर्षक विद्युत रोषणाई,प्रादेशिक वेशभुषा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उद् घाटनाच्या सोहळ्यास रंगत आणली. 'खेलो और बढो' चा संदेश व घोषणांनी संपूर्ण छत्रसाल स्टेडियम क्रीडामय झाले.त्यामुळे देशातील विविध राज्यातून आलेल्या खेळाडूंमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. 66व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी जवळपास 7 ते 8 हजार खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
दि.6जून ते 12जून 2023 दरम्यान नवी दिल्लीतील स्टेडियमवर विविध क्रिडाप्रकारातील कार्यक्रम वेळेनुसार पार पडले. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा मंत्रालय भारत सरकार नवी दिल्लीचे प्रमुख सचिव मा. श्री.दिपक कुमार (IAS), डॉ. अमरजित शर्मा, जनरल सेक्रेटरी राष्ट्रीय क्रिडा विभाग, . योगेश पालसिंह डेप्युटी डायरेक्टर ऑफ स्पोर्टस् नवी दिल्ली. .ओमप्रकाश सिनियर कोच दिल्ली, सर्व क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा मार्गदर्शक यांच्या प्रयत्नांमुळे स्पर्धा पारदर्शकपणे पार पडली.
राष्ट्रीय स्पर्धेतील सार्थकच्या यशामध्ये महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक श्री. संदीप तरटे सर,पुणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
त्याचबरोबर सार्थक चे प्रशिक्षक .प्रशांत मोरे सर ,पंढरपूर, हरिभाऊ होले सर पंढरपूर, विक्रम जाधव सर अकलूज, . आनंद शिंदे बाभुळगाव. क्रिडा शिक्षक फुले सर, डॉ.. सचिन येलभर सर, श्री.मनोज खपाले सर, पंढरपूर. सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नितीन तारळकर साहेब यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. उद्योजक नानासाहेब शिंदे , .चंद्रकांत ढवळे , . आनंद ढवळे साहेब यांचे मोलाचे योगदान लाभले.
रायफल शूटिंग सारख्या क्रीडा प्रकारात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एकलव्याप्रमाणे ग्रामीण भागातील खेळाडू तयार होतात हे सार्थक याने सिद्धकरून दाखविले. त्यामुळे ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल.
त्याच्या या यशामध्ये त्याचे आई-वडील संपूर्ण कुटुंबीय, अनवली गावचे ग्रामस्थ यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले.त्याचेवर सर्वच स्थरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.


0 Comments