मातोश्री ग्रामसमृद्धी शेत आणि पाणंद रस्ते योजने अंतर्गत मंगळवेढा तसेच पंढरपूर या दोन्ही तालुक्यातील शेत आणि पाणंद रस्ते निर्मितीसाठी ५कोटी ७६लाख रुपयांचा निधी आपले आमदार महोदय आदरणीय श्री समाधान दादा आवताडे साहेब यांनी उपलब्ध करून देऊनही प्रशासकीय स्तरावरती होणाऱ्या दिरंगाईमुळे खोळंबलेल्या या कामासंदर्भात काल मंगळवेढा येथील पंचायत समिती सभागृहात अधिकारी वर्गासोबत आमदार दादाश्री यांनी आढावा बैठक घेत मंगळवेढा तसेच पंढरपूर तालुक्यातील मंजूर कामासंदर्भात काही सुचना केल्या व लवकरात लवकर कामे पुर्णत्वास आणण्यासंदर्भात अधिकारी व कर्मचारी वर्गास आवश्यक सुचना केल्या तसेच अधिकारी वर्गाला या कामासंदर्भात होणाऱ्या दिरंगाईबाबत विचारणा करत आवश्यक सुचना करून आमदार महोदयांनी यावर तोडगा काढत तात्काळ कामे पुर्ण करण्याचे आदेश दिले.
यावेळी दोन्ही तालुक्यांचे गटविकास अधिकारी श्री.शिवाजी पाटील व श्री.प्रशांत काळे तसेच नायब तहसिलदार श्री.हेडगिरे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री.गुंड व जि.परिषदेचे श्री.कोष्टी तसेच श्री.लवटे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


0 Comments