LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आषाढी वारीत हरवलेले ९४८ भाविक शोधण्यात पोलिसांचे कौशल्य.

 


पंढरपूर (प्रतिनिधी) आषाढी वारी म्हणजे प्रचंड गर्दी, भाविकांचा अफाट जनसागर,या गर्दीत वारीत हजारो भाविक हरवितात, पण या लोकांना त्वरित शोधून देण्याचे काम पोलीस प्रशासनाच्या तीर्थक्षेत्र पोलिस, यांच्यामुळे होऊन तब्बल ९४८ हरवलेले लोक आपल्या नातेवाईक, परीचीताकडे सुखरूप पोहोचले आहेत. अशी माहिती निर्भया पथकाचे प्रमुख प्रशांत भागवत आणि पी एस आय सारीका गटकुळे यांनी दिली.

हरवलेल्या लोकांना शोधून काढण्यासाठी खास, मिसिंग स्क्वाड आणि निर्भया पथक तैनात करण्यात आले होते.

पंढरपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, चौफाळा, महात्मा गांधी रोड, पश्चिमद्वार , नामदेव पायरी, चंद्रभागा नदीचे वाळवंट , प्रदक्षिणा मार्ग या भागात भाविक हरविण्याचे प्रमाण सर्वाधिक होते, के बी पी कॉलेज, सिंहगड कॉलेज आणि स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांनी पोलिसांना विविध प्रकारे मदत केली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबाबाई पटांगण, गौतम विद्यालय, महात्मा फुले चौक, वीर सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक या सहा ठिकाणी मदत कक्ष स्थापन करण्यात आले होते. तसेच २०० स्वयंसेवक मदत करीत होते.

Post a Comment

0 Comments