पंढरपूर (प्रतिनिधी)आषाढी वारी पार पडली. आणि आता जीवाची वारी करण्यासाठी पंढरपूरकर नागरिक आता वारीतील मिनी एसेल वर्ल्ड, म्हणजेच पी टी ग्राउंड वर आलेल्या विविध प्रकारच्या राईड्स चा आनंद घेण्यासाठी येत आहेत.
आकाशपाळणा, टोरा टोरा, ड्रॅगन ट्रेन, राऊंड गेम, अशा विविध धाडसी राईड चा चित्तथरारक अनुभव घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून असे खेळ प्रकार आषाढी वारीमध्ये आहे.
बदलत्या काळानुसार या मनोरंजन प्रकारात बदल होत गेले. यामुळे टिळक स्मारक मैदान पुढील पी टी ग्राउंड गर्दीने फुलून जात आहे. युवा वर्ग , मुली महिला यांची संख्या मोठी आहे.
एका वेगळ्याच विश्वात गेल्याचा अनुभव येत आहे.
आकाशपाळण्यात बसून संपूर्ण गर्दीने फुललेले पंढरपूर शहर पाहण्याचा आनंद काही औरच आहे. वारी झाली की लाखो रुपयांची उलाढाल झाल्याने लोकांकडे पैसे आलेले असतात.
वारीतील शिणवटा घालविण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार हजारो पावले मिनी एसेल वर्ल्ड ला भेट देण्यासाठी येत आहेत. याच प्रमाणे या भागात असणाऱ्या खाऊ गल्लीत विविध खाद्यपदार्थ खाण्यासाठी खवय्ये मोठी गर्दी करीत आहेत.
भेळ,पाणीपुरी, पावभाजी, कच्छी दाबेली, हातपापडी, कांदाभजी, वडा पाव , मसाला डोसा , उत्ताप्पा , आईसक्रीम, मस्तानी यांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी होत आहे.


0 Comments