केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांची मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पंढरपूर शहर तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील विविध समस्येच्या संदर्भात निवेदन देऊन विविध विषयावर दिलखुलासपणे चर्चा केली.
यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, आरपीआय पंढरपूर शहराध्यक्ष कीर्तीपाल सर्वगोड उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील गोरगरिबांचे प्रश्न, रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आश्रम शाळा, अनवली येथील आश्रम शाळा, तुळजापूर शिंगणापूर रस्ता, पंढरपूर शहरातील समस्या, पंढरपूर फलटण रेल्वे, इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी आदरणीय रामदास आठवले साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना केल्या.
0 Comments