LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *पंढरपूर तालुक्यात खासदार प्रणिती शिंदे यांचा ग्रावभेट दौरा; मगरवाडी व पोहोरगावच्या विकासकामांना दिले आश्वासन*



सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज मोहोळ विधानसभा अंतर्गत  पंढरपूर तालुका येथील मगरवाडी व पोहोरगाव या गावांना भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.

या गावभेटीदरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत पाणी, रस्ते, आरोग्य, वीज यांसारख्या मूलभूत विषयांवर सविस्तर चर्चा केली. ग्रामस्थांचे प्रश्न ऐकून घेत त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या व उपस्थित नागरिकांकडून आशीर्वाद घेतले.

मगरवाडी गावातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले. व मगरवाडी जवळून जाणारा आळंदी - मोहोळ या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल होण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच पोहोरगाव गावाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी आणि व्यायामशाळेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच दोन्ही गावातील ग्रामस्थांनी विजेच्या ट्रान्सफॉर्मर बद्दल तक्रारी सांगितले असता खासदार प्रणिती शिंदे यांनी ताबडतोब महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ताबडतोड नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे आदेश दिले.

पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “सध्याच्या परिस्थितीत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची, शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न कणखरपणे मांडण्याची नितांत गरज आहे. ही भूमिका आम्ही आजपर्यंत सक्षमपणे बजावली असून पुढेही सातत्याने बजावत राहू.”
या ग्रामभेट दौऱ्यामुळे गावकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून विकासाच्या दृष्टीने नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

यावेळी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा समन्वयक मनोज दादा यलगुलवार, तालुका उपाध्यक्ष सादिक मुलानी, विठ्ठल चे मा. संचालक नेताजी सावंत, ज्येष्ठ नेते सुरेश सावंत मगरवाडी चे सरपंच सौ. छाया शेजाळ, पांडुरंग माने, सचिन पवार,महावीर सावंत. पोहरगावचे सरपंच भारत वाघमारे, रघुनाथ गायकवाड, गणेश घुले, वासू डोंगरे, आप्पासाहेब गायकवाड, फारूक मुलांनी, प्रदीप गायकवाड, मगरवाडी व पोहरगाव चे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments