LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

जर्शी गायीचा मोफत विमा.....

 पडळकर प्रेमीकडून आगळावेगळा कार्यक्रम.......... 

पंढरपूर प्रतिनिधी.....

आज१ ऑक्टोबर  रोजी लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. बापूसाहेब मिसाळ सर यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या सेवेत धनवीर डोडला दूध डेअरी व समृद्धी पशुखाद्य या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले .तसेच शेतकरी बांधवांना बजाज कंपनीचे  सल्लागार श्री. तेजस भाकरे साहेब यांनी विमा कंपनी बद्दल माहिती सांगून लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोर्टी (टाकावस्ती) ता. पंढरपूर येथे मोफत श्री. महादेव हाके  यांच्या  जर्शी  गायींचा विमा उतरवण्यात आला  आणि या यावेळी बोलताना माऊली हळणवर म्हणाले की पाठीमागच्या काळामध्ये पशुसंवर्धन विभागाकडून कडून विमा उतरवला जात होता महाविकास आघाडी सरकार च्या काळामध्ये ही योजना बंद करण्यात आलेली आहे लंबी रोगामुळे शेतकऱ्यांच्या पशू धनाचे प्रचंड नुकसान झाले आहे जे शेतकरी कर्ज काढतात त्यांचा विमा उतरवला जातो परंतु घरी असलेल्या जनावराचा विमा कुठलीही खाजगी कंपनी उतरवत नाही म्हणून आम्ही मोफत विमा उतरवत आहोत व ही योजना महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी चालू करावी यासाठी लवकरच भाजपा किसान मोर्चाचे शिष्टमंडळ घेऊन त्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले व आज सर्वसामान्य शेतकऱ्याला मदत व्हावी या हेतूने भाजपा किसान मोर्चाच्या वतीने काही निवडक गरीब शेतकऱ्यांच्या गाईचा विमा मोफत उतरवत आहोत या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा   प्रयत्न केला गेला. जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्व  जनावरांची शासनाने जनगणना केली पाहिजे.   सर्वच  जनावरांचा एक रुपयांमध्ये मोफत विमा उतरवला पाहिजे. तसेच पशु आरोग्य संगोपन शिबिरा मध्ये डॉ.दत्ता जाधव ,डॉ. समाधान ढोणे, डॉ.जगताप साहेब यांनी  मोलाचे मार्गदर्शन केले.

    यावेळी भाजप किसान मोर्चाचे सचिव माऊली भाऊ हळनवर ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुभाष मस्के सर,   भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य पदी नवनियुक्त झालेल्या विश्रांती ताई भुसनर, सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील,  संजय हेगडे सर ,औदुंबर ढोणे ,बापू उकरंडे, अशोक हाके, सुरेश मिसाळ ,सुरेश लवटे, समाधान शेंडगे, विष्णू ढाळे, नागा खरात, राजाभाऊ माळी, धर्मा येडगे, भैरू वाघमारे, तानाजी श्रीराम  तसेच गावातील सर्व मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments