LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

श्रीनाथ बचतगटाच्या सौजन्याने जि.प.प्रा. भंडीशेगाव शाळेस आरओ वॉटर प्लॅन्ट भेट



 पंढरपूर( प्रतिनिधी)भंडीशेगाव येथील श्रीनाथ बचतगटाने सामाजिक बांधीलकी जपत जिल्हा परिषद भंडीशेगाव  शाळेस वॉटर प्लॅन्ट भेट देऊन नवा आदर्श निर्माण केला.या वेळी झालल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष संतोषजी माने तर प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या सरपंच मनिषाताई यलमार,या होत्या. 

         या वेळी श्रीनाथ बचतगटाचे अध्यक्ष मनोहर यलमार यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील चिमुकल्यांसाठी निर्धोक पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे भाग्य लाभल्याचे व यापुढेही बचतगटाच्या माध्यमातून शाळेस मदत करण्याचे आश्वासन दिले. बचतगटाचे सदस्य राहुल लाडे यांनी मनोगतातून बचतगटाचा हेतू हा विधायक सामाजिक कार्य करण्याचा असून  चिमुकल्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून खरा आनंद गवसल्याचे सांगितले.

       भंडीशेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख खाडे सर , शा. व्य.स. चे अध्यक्ष संतोष माने यांनी मनोगतातून बचत गटातील सर्वांच्या कौतुकास्पद कार्यास शुभेच्छा दिल्या .

   यावेळी श्रीनाथ बचत गटातील  अभिजीत माने, मारुती चौगुले ,  अमोल विभुते , सचिन  यड्रावकर , सिध्देश्वर चौधरी , नामदेव माने , प्रदीप भोसले ,अमोल भोसले , गणेश कोळवले  ,बाळू  येलपले , यासीन मुलानी  ,सोमनाथ विभूते , राहुल लाडे , राजाराम विभूते  ,गणेश रत्नपारखी उपस्थित होते.   या वेळी मान्यवरांचा सत्कार गो रां कुलकर्णी यांनी केला.   

    सूत्रसंचालन नकाते यांनी केले व सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments