धनगर आरक्षणासाठी आत्महत्या करणार्या जतच्या बिरू खर्चे च्या कुटुंबाला....
प्रतिनिधी... जत
परवाच जत तालुक्यातील बिरू खर्चे या आरक्षण चळवळीतील एका कार्यकर्त्याने धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यामागणी साठी आत्महत्या केली होती आ. गोपीचंद पडळकर साहेबांनी तात्काळ त्या कुटुंबाची भेट घेऊन संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेऊन मुलांचे शिक्षण व मुलीच्या लग्नालाही मदत करणार असल्याचे जाहीर केले होते काल परवाच त्यानी हिंदूस्थान शिवमल्हार क्रांती सेना या अराजकीय संघटनेची स्थापना केली होती कवठेमहांकाळ तालुक्याचे नुतन संघटनेचे युवा नेते सुभाष खांडेकर यांनी आज खर्चे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करत ४१हजार रुपये मदत रोख मदत थेट कुटुंबाकडे सुपूर्त केली
यावेळी बोलताना हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेने'चे युवा नेते सुभाष खांडेकर म्हणाले की. कै. बिरूदेव खर्जे यांच्या दुःखद निधनामुळे सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे धनगर आरक्षण चळवळीतील एक सच्या कार्यकर्ता निघून गेला., खरंतर त्याने असा दुर्दैवी निर्णय घ्यायला नको होता... या निर्णया मुळे त्याच्या कुटुंबाला किती दुःख होत याची कल्पना त्यांना त्या क्षणाला नसते, पन ज्यावेळी आमच्यासारखे लोक त्याचा कुटुंबाला भेटायला येतात त्यावेळी त्यांना किती दुःख झालंय हे समजत. त्याच्या दुखामध्ये आम्ही सर्व जण सहभागी आहोत. आ. पडळकर यांनी ही बातमी समजल्यानंतर त्यांनी या ठिकाणी भेट देऊन सांत्वन करून या कुटुंबाची जबाबदारी घेतलीय. आम्ही सुद्धा आलोय, दुःख कमी करता येत नाही परंतु थोडीशी आर्थिक मदत करून त्यांच्या दुखात सहभागी होतोय. ईश्वराने त्यांना या प्रसंगातून सावरण्याची ताकद देवो ही प्रार्थना करतो. त्यांचा सर्व कुटंबीयांच्या दुखत मी सहभागी होतोय. मी सर्वाना एक विनंती करतो कि स्वतःचा जीव देऊन काय मिळत नसते कुटुंबाला दुःख होत असत... धनगर आरक्षणाची लढाई अंतिम टप्यात आली आहे. डिसेंबर मध्ये होणाऱ्या सुनावणीत आपल्याला नक्की न्याय मिळेल. आ. गोपीचंद यांनी सुद्धा सरकारला धनगर आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढावा अशी मागणी केली आहे... आणि यांच्या या भूमिकेमुळे आत्ता आरक्षणाच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.... परंतु शेवटी काही निर्णय हे कायद्याच्या कचोटीमधून सुद्धा उतरायला लागतात, ज्या पण काही अडचणी येतायेत त्या स्वतः आमदार साहेब लक्ष घालून बगतायत. त्यामुळे निश्चित यातून मार्ग निघेल... त्यामुळे सर्वांनी धीर धरावा. आणि इथून पुढे कोणीही असा विपरीत निर्णय घेऊ नये... कि ज्या मधून त्याचा कुटुंबाला त्रास होईल. जीव देऊन न्हवे तर संघर्ष करून आपल्याला आरक्षण मिळवायचंय . बगा बोलून काय दुःख कमी होत नाही झालेली वास्तुतिथी आहे आणि आम्ही सुद्धा खरोखर दुःखी आहोत... परमेश्वर चरणी प्रार्थना करतो कि बिरूदेव खर्जे यांचा आत्म्यास चिरशांती मिळो......


0 Comments