अध्यात्मिक व सांप्रदायिक विचारमार्गांचे केंद्रबिंदू व संत विचारांचा अगाध महिमासंपन्न असणाऱ्या पवित्र संतभूमी आपल्या मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील श्री.समर्थ सद्गुरू बाळकृष्ण महाराज (माऊली) यांच्या ५३ व्या पुण्यतिथीनिमित्त आज आपले आमदार आदरणीय श्री समाधान दादा आवताडे साहेब यांनी सद्गुरू बाळकृष्ण माऊलींचे दर्शन घेत विनम्र अभिवादन केले.
अध्यात्मिक आणि सांप्रदायिक विचार मूल्यांना अभिप्रेत कार्यसेवा करून दैवत्वाचा साक्षात्कार घडवून आणणारे सद्गुरू बाळकृष्ण माऊलींना अभिवादन करत आमदार दादाश्री यांनी परिसरातील जनतेसोबत संवाद साधत चर्चा केली.
यावेळी उपस्थित जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री. प्रदीप खांडेकर, श्री .जगन्नाथ रेवे, श्री. भारत गरांडे, श्री. बापू मेटकरी, श्री.दामाजी बंडगर, श्री.आकाश डांगे, श्री.दादा दोलतोडे, श्री.नामदेव जानकर, श्री.दादा गरांडे ,श्री.दत्ताभाऊ साबणे आदी मान्यवर व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..


0 Comments