LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

जळगाव येथील आदिवासी कोळी जमातीच्या अन्नत्याग आंदोलनास पंढरपुरातील आदिवासी कोळी जमातीचा पाठींबा

 आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलनाला छत्रपती भेट का देत नाहीत? आम्ही राजांची रयत नाही का?- गणेश अंकुशराव

पंढरपुर दि. 20 प्रतिनिधी :  राज्यातील अन्यायग्रस्त महादेव, मल्हार, टोकरे आणि ढोर कोळी जमातीला जात व वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळू दिले जात नाही. ते सुलभरित्या मिळावे यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर कोळी जमातीचे समाज बांधव दहा दिवस झाले आमरण अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला पंढरपुरातील आदिवासी कोळी जमात बांधवांनी पाठींबा जाहीर केलाय. आज पंढरपुरातील आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे चौकात आदिवासी कोळी जमात बांधवांनी एकत्रीत येऊन शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या तसेच आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे, तंट्यामामा भिल्ल, बिरसा मुंडा या महापुरुषांच्या जयघोषणा देत, एक तीर एक कमान-सारे आदिवासी एकसमान अशा घोषणांणी परिसर दणाणून सोडला होता.  

 दहा दिवस झाले हे आंदोलन सुरु असुनही अद्याप याची दखल राज्य शासनाने घेतलेली नाही, मराठा समाजाच्या आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देणारे राज्याचे मंत्री व आमदार यांचेसह छत्रपती शिवरायाचे वंशज असणारे छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे छत्रपती हे कोळी समाजाच्या आंदोलनस्थळी भेट का देत नाहीत? राजे हे सर्व जनतेचे असतात, आम्ही छत्रपतींच्या रयतेत मोडत नाही का? राजांना सर्व जनता समान असते मग छत्रपती आमच्या आंदोलनस्थळी भेट का देत नाहीत? असा सवाल यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी यावेळी उपस्थित केला आहे. राज्यकर्ते आमच्या उपोषणकर्त्या जमात बांधवांच्या मरणाची वाट बघतंय का? असा माझा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.


या आंदोलनाची दोन दिवसात शासनाने दखल घेतली नाही तर उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा गणेश अंकुशराव यांनी आज राघोजी भांगरे चौक पंढरपूर या ठिकाणी असंख्य कार्यकर्त्यांसह दिला आहे. आम्हाला न्याय मिळाला नाही तर कार्तिकी यात्र्रेला पंढरपुरात उपमुख्यमंत्री अथवा कोणत्याही मंत्र्यांना फिरकु देणार नसल्याचं निवेदन याआधीच आम्ही दिलय परंतु याबाबत कोणत्याही प्रशासकीय अधिकार्‍यांनी अद्याप दखल घेतली नसल्याची माहितीही यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिलीय. यावेळी पांडुरंग सावतराव, निलेश माने, अरविंद नाईकवाडी, गणेश कांबळे, विकी अभंगराव, सुशील नेहतराव, नितेश म्हेत्रे, माऊली कोळी, अमोल तावसकर, सुरेश शिरसट, श्रीकांत ननवरे, अनिल कांबळे, किशोर सुरवसे, नवनाथ अभंगराव, रामकृष्ण कोळी, अक्षय म्हेत्रे, प्रकाश मगर, केदार माने, बंडु संगीतराव, मारुती तावसकर, महेश अभंगराव, दिपक सावतराव, शंभू नेहतराव, बाळासाहेब अधटराव, भैया परचंडे, सुरज ननवरे, भैया ननवरे यांचेसह अनेक कार्यकर्ते होते

Post a Comment

0 Comments